Rain Alert For Tommorrow | उद्यापासून राज्यात पावसाचा अलर्ट, या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा हवामान खात्याचा इशारा.
Imd Alert :- ऑगस्ट महिना संपत आला तरी राज्यात अजूनही पावसाचा थांगपत्ता नाही. पावसाअभावी राज्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहे.
कृषि विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 19 जिल्ह्यातील 376 मंडळामध्ये गेल्या 21 दिवसा पेक्ष्या जास्त दिवस होऊनही पाऊस झालेला नाही आहे. त्यामुळे खरीपातील पिकांच्या उत्पादनात 50% पर्यंत घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Indian Meteorological Department
हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवसात पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार उद्या दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी प्रमुख 11 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे.
हवामान अंदाज महाराष्ट्र
त्यामध्ये अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा एलो अलर्ट देऊन मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.
सोबतच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे.