
- Kanda-Anudan-Yojana-2023
Kanda Anudan Yojana 2023 | या जिल्ह्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 350/- रु. प्रती क्विंटल अनुदान | 465 कोटी रु. GR आला
Kanda Anudan 2023:- कांदा अनुदान वितरणाबाबत दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी चा शासन निर्णय या शासन निर्णयान्वये अधिक्रमीत करण्यात येत आहे.
2. या योजनेतंर्गत पात्र लाभार्थींना वितरीत करावयाच्या एकूण अनुदानाची रक्कम रू. 857,67,58,608 /- कोटी (रू.857 कोटी,67 लाख,58 हजार,608 ) इतकी आवश्यक असल्याचे पणन संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी कळवले आहे. मात्र सद्यस्तिथित वित्त विभागाने या योजनेसाठी रू.465.99 कोटी (अक्षरी रूपये 465 कोटी, 99 लाख फवत) इतकी रवकम खर्च करण्यास मान्यता दिली असल्यामुळे या योजनेखाली उपलब्ध रू.465.99 कोटी (अक्षरी रूपये 465 कोटी 99 लाख फवत) इतक्या निधीतून सद्यस्तिथित पहिल्या टप्प्यात खालीलप्रमाणे निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2.1 कांदा अनुदानासाठी रू. रू.10.00 कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक 14 जिल्ह्यातील ( जिल्हा – नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशिम ) लाभार्थी यांन संपूर्ण 100 टवके प्रमाणे आवश्यक अनुदानाची रक्कम रू.22,69,17,681/- (रू.22 कोटी,69 लाख, 17 हजार, 681 फक्त ) इतकी आहे. ( सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचा तपशील सांगणक प्रणालीवर अपलोड केल्यानांतर उपरोक्त नमूद अनुदानाच्या रवकमेत वाढ अथवा घट होवून निश्चित होईल इतकी अनुदानाची रक्कम ) सबब सदर 14 जिल्ह्यातील लाभार्थी यांना संपूर्ण अनुदानाची रक्कम सर्वप्रथम प्रथम अदा करण्यात यावी.
Kanda Anudan Yojana 2023
2.2 रू.10.00 कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक उर्वरित 10 जिल्ह्यातील (जिल्हा धुळे,कोल्हापूर,औरांगाबाद,उस्मानाबाद,बीड,जळगाांव,पुणे,सोलापूर, अहमदनगर,नाशिक =) लाभार्थी यांना आवश्यक अनुदानाची रक्कम रू. 834,98,40,926/- (रू. 834 कोटी,98 लाख,40 हजार, 926 फक्त ) इतकी आहे( सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचा तपशील सांगणक प्रणालीवर अपलोड केल्यानांतर उरोक्त नमूद अनुदानाच्या रवकमेत वाढ अथवा घट होवून निश्चित होईल इतकी अनुदानाची रक्कम ) सबब सदर लाभार्थी यांना खालीलप्रमाणे अनुदान वाटप करण्यात यावे.
अ) अनुदान वितरनाबाबत ज्या लाभार्थी यांना देय अनुदानाची रक्कम रु.10,000/- ( अक्षरी रूपये 10 हजार ) पेक्षा कमी आहे त्याप्रकरणी संपूर्ण अनुदानाची रक्कम तसेच ज्या लाभार्थ्यांची एकूण देय अनुदानाची रक्कम रु.10,000/- अथवा रू. 10,000/- पेक्षा जास्त आहे, त्याप्रकरणी पहिल्या टप्प्यात रू. 10,000/- (अक्षरी रूपये 10 हजार – ) इतक्या कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी.
कांदा अनुदान योजना 2023
ब) उपरोक्त सुचनाप्रमाणे कार्यवाही करत असताना प्रथम टप्प्यातील अनुदान अदा करण्यासाठी पात्र लाभार्थी यांची यादी तपासून देयक मान्यतेसाठी सांगणक प्रणालीवर अपलोड करावी आणि सदरच्या टप्प्यातील अनुदान वितरित केल्यानांतर पुढील टप्पा लागू होत असलेल्या लाभार्थी यांची यादी जतन करणे, देय रक्कम टप्प्यानुसार लाभार्थ्यांना देणे, लाभार्थीनिहाय देयकाचा ताळमेळ ठेवून सुधारित यादी सांगणक प्रणालीवर अपलोड करण्याची जबाबदारी सहायक निबंधक व जिल्हा उपनिबंधाक यांची राहील. यासाठी आयआयसीआय बँकेच्या संबंधित अधिकाऱ्याशी वेळोवेळा संपर्क ठेवून मार्गदर्शन घ्यावे.
क) त्यानंतर ज्याप्रमाणात उर्वरित रक्कम वित्त विभागाकडून उपलब्ध होईल त्याप्रमाणात पात्र लाभार्थी यांची पहिल्या टप्याची रक्कम अदा केल्यानांतर देय असलेली उर्वरित अनुदानाची रक्कम अदा करण्याबाबत सुधारीत सूचना देण्यात येतील.
2.3 एका लाभार्थीस दुबार अनुदान वितरित होणार नाही तसेच अपात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
3. पात्र लाभार्थी यांच्या यादीचे संबंधित ग्रामसभा/चावडी येथे वाचन करावे/ग्रामपंच्यायतीच्या फलकावर यादी प्रसिद्ध करावी. अपात्र लाभार्थी अथवा अनियमितता आढळून आल्यास संबंधितानवर कडक कारवाई करण्यात येईल.
4. या योजनेअंतर्गत अनुदान वितरित करण्यासाठी रू.550 कोटी (अक्षरी रूपये 550 कोटी फक्त ) इतकी रक्कम सन 2023 च्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली असून या रकमेपैकी रू.465.99 कोटी (अक्षरी रूपये 465 कोटी,99 लाख फक्त) इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे.