Havaman Andaj Today
Havaman Andaj Today:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, कालपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताज्या अंदाजानुसार राज्यात 25 नोव्हेंबर रोजी संपुर्ण राज्याला Havaman Andaj Today हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे.
यामध्ये संपुर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुख्यता ढगाळ वातावरण राहून वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.
Havaman Andaj Today
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील 5 जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असून यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, जळगाव या जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
तर नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, बुलढाणा, बीड, धाराशीव, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Nice up todate