Cyclone Michaung Update | चक्रीवादळाचा धोका वाढला ! ‘या’ राज्यांना अतिदक्षतेचा इशारा ; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम ?

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
79 / 100 SEO Score

Cyclone Michaung Update

Cyclone Michaung Update

Cyclone Michaung Update:- राज्यात गेल्या 6 ते 7 दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर बघायला मिळत आहे. राज्यात पुढील आणखी काही दिवस अवकाळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज हवामान खात्याचा आहे.

राज्यात दिनांक 26, 27 व 28 नोव्हेंबर रोजी राज्यात बऱ्याच भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला व काही जिल्ह्यात जोरदार गारपीट सुद्धा झालेली आहे.

थंडीचा तिसरा महिना सुरू झाला असला तरी राज्यात म्हणेल त्या प्रमाणात थंडी पडायला सुरुवात झालेली नाही आहे, याच कारण म्हणजे राज्यासह इतरही राज्यात होत असलेला अवकाळी पाऊस.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

दरम्यान बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ घोंगावत आहे, या चक्रीवादळाला ‘मिचांग’ Cyclone Michaung Update असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा विशेषता प्रभाव हा देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसून येत आहे. या चक्रीवादळाचा परिणाम स्वरूप अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 2 डिसेंबर च्या मध्यरात्रीनंतर 3 डिसेंबर पर्यन्त बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ नावाच चक्रीवादळ तयार होणार आणि 4 डिसेंबर रोजी दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीलगत समांतर जात उत्तरेकडे सरकणार.

Cyclone Michaung Update

त्यानंतर हे चक्रीवादळ 5 डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान दक्षिण आंध्रप्रदेश ओलांडून नेल्लोर-मछलीपट्टणम दरम्यान धडकेल यावेळेस वाऱ्यांचा वेग हा 80 ते 90 किमी प्रतीतास इतका राहणार आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार ओडिशा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यात 3 ते 5 डिसेंबर दरम्यान मुसळधार अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोबतच स्कायमेट या खासगी संस्थेने दीलया माहितीनुसार येत्या 24 तासात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा होण्याचा अंदाज दिला आहे.

 👉Nuksan Bharpai Yadi 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! नुकसान भरपाईचा GR आला; इथे बघा या जिल्ह्याची यादी
👉Rabi Crop Insurance Last Date 2023 | रब्बी पिकांचा पीक विमा भरण्यासाठी ही आहे शेवटची तारीख ; आपण पीक विमा भरला नसेल तर लगेच भरा

Leave a Comment