Weather Update
Weather Update:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात ढगाळ वतावरणासह जोरदार अवकाळी पाऊस झाला होता.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 17 व 18 डिसेंबर रोजी तामिळनाडू, केरळ, माहे, लक्ष्यदीप मध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, सोबतच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Weather Update
भारतीय हवामान खात्याने IMD महाराष्ट्रात पुनः एकदा अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे, पुढील 48 तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
उर्वरित जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या Weather Update अंदाजानुसार उद्या 17 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.