PM Kisan 16th Installament Date
PM Kisan 16th Installament Date :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान चे एकूण 15 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे, यातील 15 वां हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी पात्र शेकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
त्यामुळे शेतकरी पीएम किसान चा 16 वां हप्ता बँक खात्यात कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत आहे तर अश्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की योजनेचा 16 वां लवकरच बँक खात्यात येणार आहे.
मित्रहो आतापर्यंत पीएम किसान चा 16 वां हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आला असता पण योजणेचे 15 हप्ते आजपर्यंत वाटप करण्यात आले तरी पण अजूनही काही शेतकरी पात्र असूनही योजनेपासून वंचित आहे.
👉Mansoon 2024 Prediction | ला-निनामुळे यावर्षीचा मान्सून धो-धो बरसणार ! El Nino जाऊन La-Nina येणार का ?👈
अश्या शेतकऱ्यांचा योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायशी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषि आयुक्त डॉ. प्रवीण गेडम यांनी दिले होते.
PM Kisan 16th Installament Date
या मोहिमे अंतर्गत ई-केवायशी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, आदि बाबींची पूर्तता करण्यासाठी ही मोहीम 21 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात येत आहे.
त्यामुळे जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित होते आणि त्या शेतकाऱ्यांनी कृषि विभागाकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत भाग घेतला असल्यास अश्या शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान योजनेचा 16 वां हप्ता PM Kisan 16th Installament Date मिळण्याची शक्यता आहे.
Beneficiary Status
तर शेतकरी मित्रहो आपण आतुरतेने वाट पाहत असलेला पीएम किसान चा 16 वां हप्त्याचे (2000 रु.) वितरण येत्या बुधवारी म्हणजेच 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येत आहे.
सदर पीएम किसान च्या 16 व्यां हप्त्याच्या वितरणाची माहिती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.