Drought Relief Fund
Drought Relief Fund :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात गेल्या खरीप 2023 हंगामात पाऊस कमी पडल्याने राज्य शासनाने काही तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे.
राज्य सरकारने राज्यातील 40 तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मदत दिली जाते व शेतकरी या मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज या दोन्ही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने राज्य शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
Drought Relief Fund
या तालुक्यातील नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून तहसील कार्यालयातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगिनल अपलोड करण्यात आल्या आहेत. सदर याद्यांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरी मिळताच नुकसानग्रस्त Drought Relief Fund शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी जमा होणार आहे.
दोन्ही तालुक्यातील तहसील कार्यालयाने 11 हजार 117 नुकसानग्रस्त शेतकरी खतेदारांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगिनल अपलोड केली आहे, शासनाने पहिल्या टप्प्यात 4 कोटी 9 लाख 97 हजार रुपये निधीला मंजूरी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरी मिळताच सादर निधी वरील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.
परंतु यातील 654 शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार क्रमांक चुकीचे असल्याने त्यांच्यासाठी मंजूर 24 लाख 37 हजार रुपयांचा मदत निधी जमा होण्यास विलंब होणार असून संबंधित 654 शेतकऱ्यांकडून बँक खाते आणि आधार क्रमांक पुनः मागविले आहे.
मित्रहो, उर्वरित दुंडगे, नेसरी, गडहिंग्लज मंडळातील शिल्लक गावातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अजून 1 कोटी 85 लाख मदत निधीची आवश्यकता आहे.