Electricity Rate Hike
Electricity Rate Hike :- नमस्कार मित्रहो, राज्यात वीज दर वाढीचा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेतला असून तब्बल 12 टक्के पर्यंत वीज दर वाढीला मंजूरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने लागू केलेली दर वाढ ही सर्वच घटकांच्या वीजेच्या वापरासाठी असून जवळपास 12% पर्यन्त वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता राज्यात दुष्काळी परिस्तिथी असताना व त्या परिस्तिथीशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना या दरवाढीच्या माध्यमातून जोरदार शॉक दिलेला आहे.
Electricity Rate Hike
विजेचा स्थिर आकार 2022-23 ला लघुदाब कृषिपंपासाठी 43 रुपये प्रती HP इतका होता. तो आता 2024-25 मध्ये दरवाढ ही 52 रुपये प्रती HP इतकी करण्यात आली आहे.
तर उच्च दाब कृषिपंपासाठी 80 रुपये प्रती KVA इतका स्थिर आकार होता. तो आता 2024-25 मध्ये 97 रुपये प्रती KVA इतकी दरवाढ करण्यात आली आहे. आणि ही दरवाढ 1 एप्रिल पासून लागू करण्यात आली आहे.