Imd Warning For 9 July
Imd Warning For 9 July :- मित्रहो, गेले 2 दिवसापासून राज्यात बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाल्याच पाहायला मिळत असून विविध ठिकाणी पुरपरिस्तिथी बघावयास मिळत आहे. अशातच हवामान विभागाने राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे मुंबई व परिसरात पुरपरिस्तिथी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या मते पुढील 24 तासात राज्यातील काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार व काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे.
Imd Warning For 9 July
हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी राज्यातील पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणी ढगफूटीसदृश्य पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सोबतच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा पुढील 24 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यात सुद्धा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
👉Skymet Monsoon 2024 Prediction | स्कायमेटचा मान्सून चा अंदाज आला ! यावर्षीचा मान्सून 2024 सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज