Rain Update | राज्यात पावसाचा जोर वाढणार ! या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
79 / 100

Rain Update

Rain Update

Rain Update :- नमस्कार मित्रहो, राज्यात जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत असून, पुनः राज्यात मुसळधार कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. 

गेले 2 दिवसापासून राज्यात बहुतेक जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी पाऊस थांबला असला तरी दिनांक 1 ऑगस्ट व 2 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Rain Update

यामध्ये दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोबतच वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून पावसाचा इशारा दिला आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी चंद्रपूर, वर्धा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन मुसळधारेचा इशारा दिला आहे. गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. 

👉Gharkul List 2024 Maharashtra | घरकुल यादी आली ! वैयक्तिक घरकुल योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी जाहीर

Leave a Comment