Cyclone Dana Update
Cyclone Dana Update :- नमस्कार मित्रहो, राज्यातून मान्सून माघारी फिरला असाल तरी राज्यात विविध जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळतो आहे.
राज्यात मुसळधार पाऊस होत असतानाच खरीपातील पिके काढणीला आले असून काही ठिकाणी पावसाने पिकांचे नुकसान सुद्धा झालेले आहे. अश्यापरिस्तिथी मध्ये खरीपातील पिकांची काढणी पण चालू आहे.
अशातच आता बंगालच्या उपसागरात पुनः नव्याने एक चक्रीवादळ तयार होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत “दाना” नावाचे चक्रीवादळ तयार होणार असून या चक्रीवादळाचे पुढील मार्गक्रमण बंगालच्या उपसागरात वायव्य दिशेने होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Cyclone Dana Update
सोबतच हवामान विभागाने पुढील 2 दिवस आपल्या राज्यात विविध जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होणार असा अंदाज दिलेला आहे. यामध्ये दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील संपुर्ण जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशीव, लातूर, सोलापूर, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.