Havaman Andaj Today
Havaman Andaj Today :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यातील वातावरणात मोठे बदल होताना आपल्याला पाहायला मिळत असून राज्यात बऱ्यापैकी सर्वच जिल्ह्यात किमान तापमानात वाढ झालेली दिसत आहे.
शेतकरी मित्रहो राज्यात काही दिवसाअगोदर थंडीची लाट मोठ्या प्रमाणात आलेली पाहायला मिळाली होती, पण आता राज्यातील सर्वच भागात तापमानात वाढ होऊन पुढील काही दिवस वादळी पाऊस व गारपिट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला असून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येते आहे.
Havaman Andaj Today
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस व गारपिट होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्यामते उद्या दिनांक धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन जोरदार अवकाळी पाऊस व गारपिट होण्याचा अंदाज आहे.
सोबतच छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात सुद्धा जोरदार पावसासोबत गारपिट होण्याची शक्यता आहे. पुणे, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे.