Havaman Andaj Live Today
Havaman Andaj Live Today :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात गेल्या 2 दिवसांत बहुतेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व काही ठिकाणी गारपिट पाहायला मिळाली आहे. आता हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना वादळी पाऊस व उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस व काही जिल्ह्यात गारपिट झालेली पाहायला मिळाली असून राज्यात पुढच्या 48 तासात वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे.
Havaman Andaj Live Today
यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशीव, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वादळी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेच्या इशारा देण्यात आला आहे.
👉Traffic Rule 2025 In India | नियम तोडल्यास 10 पट दंड आणि 3 वर्षाचा तुरंगवास ; काय आहे नवीन ट्राफिक नियम !
👉Farmer Subsidy 2025 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! या शेतकऱ्यांचा अनुदानाचा शासन निर्णय आला.