Havaman Andaj Maharashtra
Havaman Andaj Maharashtra :- नमस्कार मित्रहो, राज्यात उष्णतेच्या लाटेसह मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय झाला असून गेले 4 ते 5 दिवसापासून राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळते आहे. हवामान खात्याने 31 मे 2025 पर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे.
गेल्या 2 दिवसांमध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात मॉन्सूनपूर्व पाऊस सक्रिय झाला असून वीजांच्या कडकडाटासह पाऊस होताना बघावयास मिळत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे, यामध्ये विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळू शकते.
Havaman Andaj Maharashtra
हवामान खात्यानुसार उद्या दिनांक 17 मे 2025 रोजी सायंकाळपर्यंत संपुर्ण राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला असून यामध्ये वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यासोबतच विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, पालघर, ठाणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्हयान सुद्धा मध्यम ते जोरदार पवसच इशारा देण्यात आला आहे.
यासोबतच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.