Havaman Andaj Today
Havaman Andaj Today :- नमस्कार, राज्यात बहुतांश जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होत असून हवामान विभागाने संपुर्ण महाराष्ट्राला अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे. तर यासंदर्भातच या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात, मालदिव आणि कोमोरिण क्षेत्रात, दक्षिण बंगालच्या उपसागरात, अंदमान बेटे आणि अंदमान समुद्राचे उर्वरित भाग व पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात प्रवेश केला असून पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल आहे.
Havaman Andaj Today
यासोबतच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून वीजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे.
यामध्ये दिनांक 17 मे 2025 रोजी धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.
यासोबतच 18 मे 2025 रोजी पुणे, पुणे जिल्ह्याचा घाट परिसर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागाला पुढील 48 तासासाठी अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे.
👉New Update Ration Card | आता “या” नागरिकांचे रेशन बंद होणार ! लवकर हा फॉर्म भरा