Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alert :- नमस्कार मित्रहो, राज्यभरात जोरदार पाऊस होत असून गेल्या 24 तासात कोकण विभागात मुसळधार पाऊस व पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होताना दिसत आहे. कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मे महिना सामान्यतः महाराष्ट्रासाठी उन्हाचा कडाका आणि पाण्याची टंचाई घेऊन येतो. मात्र, २०२५ चा मे महिना याला अपवाद ठरला. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि कोकणातील अनेक भागांमध्ये मे महिन्यात मुसळधार पावसाची नोंद झाली.
विशेष म्हणजे पुण्यात गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक मेमधील पावसाची नोंद झाली असून हवामान खात्याच्या माहितीनुसार, १५ मे रोजीच शहरात ३० मिमीहून अधिक पाऊस कोसळला.परिणामी अनेक भागांत झाडे कोसळणे, वीजपुरवठा ठप्प होणे, रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहतुकीला अडथळा अशा समस्या निर्माण झाल्या.
Maharashtra Rain Alert
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दिनांक 24 मे 2025 रोजी बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पाहायला मिळू शकते यासोबत मराठवाडा विभागात सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळू शकते.
आज दिवसभरात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, यवतमाळ, बुलढाणा, नांदेड, लातूर या जिल्ह्यात सुद्धा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशीव, अहिल्यानगर, बीड, परभणी, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.