IMD Alert For 6 April
IMD Alert For 6 April :- नमस्कार शेतकरी बंधूंनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची बाब आहे की पुढील काही दिवसात राज्यात पुनः एकदा वादळी पावसाला सुरुवात होणार आहे.
शेतकरी मित्रहो आपणास माहितीच आहे की मार्च महिन्याचा शेवट हा सुद्धा वादळी पावसाने झालेला आहे. आणि आता एप्रिल महिन्याची सुरुवात होत नही तोच राज्यात पुनः एकदा वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे. यामध्ये जर हा हवामान विभागाने दिलेला हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान शक्यता आहे.
IMD Alert For 6 April
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 5 एप्रिल पासून पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान 30 ते 40 किमी. प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
यामध्ये 5 एप्रिल रोजी खांदेश विभागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे तर 6 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर, सोलापूर, सांगली, बीड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन पावसाचा इशारा IMD Alert For 6 April दिलेला आहे.
हे पण वाचा 👉Nuksan Bharpai Yadi Maharashtra | शासन निर्णय आला ; या 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर ! यादीत नाव पहा
7 एप्रिल रोजी यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, बीड, अहमदनगर, सोलापूर, धाराशीव या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यात सुद्धा वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.