India Meteorological Department Alert | पुढील 24 तासात हे 6 जिल्हे वगळता राज्यात गारपीटीसह वादळी पावसाचा इशारा ? 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100

India Meteorological Department Alert

India Meteorological Department Alert

India Meteorological Department Alert :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात उष्णतेची लाट असताना भर उन्हात राज्यात बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिट व पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात उषतेच्या लाटेसह 8 एप्रिल च्या सायंकाळ पर्यंत म्हणजेच पुढील 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी सोबतच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. यावेळेस वाऱ्याचा वेग हा ताशी 30 ते 40 किमी. राहण्याचा अंदाज आहे.

India Meteorological Department Alert

हवामान विभागाच्या मते पुढील 24 तासासाठी अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन इथे गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

सोबतच वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, बीड, परभणी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे. याबरोबरच मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातिल इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हे पण वाचा 👉Pik Karjmafi 2024 | अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी जाहीर ! या शेतकऱ्यांना मिळणार लाभ ; शासन निर्णय आला

Leave a Comment