Ladki Bahin Yojana 1st Installment Date
Ladki Bahin Yojana 1st Installment Date :- नमस्कार, राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली आहे तर या योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली असून त्यासंदर्भातच माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली तेव्हापासून ही योजना राज्यात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली असून आता या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज सादर केले आहे व वैध ठरले ते योजनेच्या पहिल्या हप्त्याची वाट पाहत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वाटपासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत असून दिनांक 7 ऑगस्ट रोजी शासन दरबारी मोठा निर्णय झाल्याच समजते आहे.
Ladki Bahin Yojana 1st Installment Date
यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यावर वितरित करण्याची माहिती समोर येते आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचा मिळून एकत्रित हप्ता म्हणजेच रुपये 3000/- पात्र महिलांच्या खात्यावर येणार आहे.
या निर्णयामुळे राज्यातील महिलांना रक्षाबंधणापूर्वी महत्वाची भेट मिळणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 1 कोटी 40 लाख 10 हजार 215 अर्ज ऑनलाइन भरण्यात आले असून त्यापैकी 1 कोटी अर्जाची छाननी करण्यात आली आहे. जवळपास 12 हजार अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचे समजते आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.