Indian Meteorological Department | शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, ऑगस्ट मध्ये मान्सून सामान्यपेक्ष्या कमी बरसणार
Imd Alert For Maharashtra :- राज्यासह देशात गेल्या जुलै महिन्यात बहुतांश ठिकाणी जवळपास सरासरी इतका पाऊस झालेला आहे, यामध्ये आपल्या राज्याचा विचार करायचा झाला तर जून महिन्यापेक्ष्या जुलै मध्ये चांगला पाऊस झालेला आहे.
राज्यात विदर्भ, कोकण विभागात जुलैमध्ये सरासरी इतका किंबहुना थोडा जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही आहे.
ऑगस्ट मध्ये पाऊस कसा राहणार ?
सध्याच्या परिस्थितिमध्ये अल-निनो कमजोर असला तरी पुढच्या काही काळात अल-निनोची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे व येण्याऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
अशातच भारतीय हवामान खात्याने 31 जुलै रोजी दिलेल्या सुधारित ( नवीन ) अंदाजानुसार देशात ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्ष्या (<94% एलपीए) कमी होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामन खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये हिमालय व हिमालया लगत असणारे भाग, पूर्व मध्य भारत, पूर्व व उत्तर-पूर्व भारतात सरासरी पेक्ष्या जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे तर दक्षिण भारत, उत्तर-पश्चिम भारत व मध्य भारतातील पश्चिम भागामध्ये सरासरी पेक्ष्या कमी पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात सुद्धा ऑगस्ट मध्ये आपल्याला पाऊस कमी बघायला मिळू शकते,
ऑगस्ट मध्ये तापमान कसे राहणार ?
या काळात पूर्व व उत्तर-पूर्व भारतातील बहुतांश भागात सोबतच उत्तर-पश्चिम व मध्य भारतातील पश्चिम भागात कमाल तापमान सरासरी पेक्ष्या जास्त राहण्याची शक्यता आहे तर पूर्व-मध्य भारत व हिमालय, त्यासोबतच्या मैदानी प्रदेशात कमाल तापमान ही सरासरी इतके किंवा त्यापेक्ष्या कमी राहण्याचा अंदाज आहे.