![Namo Shetkari Yojana](https://marathi24taas.in/wp-content/uploads/2023/10/Namo-Shetkari-Yojana-1-300x150.png)
Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Yojana :- नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की राज्य शासनाने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर जाहीर केलेल्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार ते.
राज्य शासनाच्या वतीने पीएम किसान च्या धर्तीवर नमो शेतकरी शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून वर्षीयला प्रती शेतकरी रुपये 6000/- देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यामुळे पात्र शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या Namo Shetkari Yojana पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते, आता योजनेचा पहिला हप्ता लवकरच म्हणजे येत्या गुरुवारी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जाणार आहे.
Namo Shetkari Yojana
नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण येत्या गुरुवारी (26 आक्टोबर) शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री सोबतच इतर मंत्री सुद्धा उपस्थित राहतील.
या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्या सरकारने रुपये 1720 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. सोबतच राज्यातील जवळपास 93 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.