Weather Update For 27 November
Weather Update For 27 November:-नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे, सोबतच काही जिल्ह्यात गारपीठ सुद्धा झालेली आहे अशातच हवामान खात्याने पुढील 24 तासात राज्यात वादळी पाऊस होणार असा अंदाज दिलेला आहे तर त्यासंदर्भातच माहिती जाणून घेणार आहोत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 2 दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी Weather Update For 27 November पाऊस बघायला मिळणार आहे.
काल दिनांक 26 नोव्हेंबर रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस व काही ठिकाणी गारपीठ सुद्धा झाल्याच बघायला मिळालं आहे, यामध्ये जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, बीड, अहमदनगर, नांदेड, नाशिक, धुळे, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झालेला आहे.
Weather Update For 27 November
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात राज्यात विविध वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे; 27 नोव्हेंबर रोजी अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देऊन मुसळधार पाऊस व काही ठिकाणी गारपीठ होण्याचा इशारा दिला आहे.
सोबतच अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांना एलो अलर्ट देऊन मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
28 नोव्हेंबर रोजी राज्यातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, जळगाव, जालना, बुलढाणा, आकोला, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड, नाशिक, पालघर या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे.