Cyclone-Mocha |
Cyclone Mocha
मोचा चक्रीवादळ धडकणार ! महाराष्ट्रासह देशातील या भागांना हवामान खात्याचा अलर्ट | IMD Rainfall Alert
बंगालच्या उपसागरात आजपासून मोचा चक्रीवादळ तयार होण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे. भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार देशातील विविध राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.’मोचा चक्रीवादळ’
हवामान खात्याने ओडिशा, आंध्र प्रदेश, पच्छिम बंगाल या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 8 मे रोजी दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज वर्तवीला आहे.
चक्रीवादळ मोचा म्हणजे काय ?
या कमी दाबाचे रूपांतर 9 मे रोजी अतितीव्र कमी दाबात होण्याचा अंदाज आहे. आणि त्यानंतर या तीव्र कमी दाबाचे रूपांतर मोचा चक्रीवादळामद्धे होण्याचा अंदाज हवामान विभागाचे वरिष्ठ तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितला आहे.मोचा चक्रीवादळ कुठे आहे ?
या चक्रीवादळाचं मार्गक्रमण बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे होणार आहे. दरम्यान हवामान विभागाने 8 ते 12 मे रोजी अंदमान ,निकोबारला जोरदार वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ घोंगावणार असल्याने समुद्र खवळलेला राहील त्यामुळे मच्छिमारांनी 8 मे ते 12 मे या कालावधीत समुद्रात जावू नये असा सल्ला देण्यात आला आहे .”IMD Rainfall Alert”
या चक्रीवादळाला मोचा नाव कसे पडले ?
मोचा हे येमेण मधील एक शहराचे नाव असून हे शहर कॅाफीच्या व्यापारासाठी ओळखले जाते. मोचा कॅाफीचे नावही याच नावावर ठेवण्यात आले. त्यामुळे या चक्रीवादळाला येमनने मोचा हे नाव दिले.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अलर्ट
आज 7 मे रोजी राज्यातील अहमदनगर, बीड, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशीव, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट देऊन वादळी पावसाचा इशारा दिल आहे .panjabrao dakh havaman andaj
उद्या 8 मे रोजी अहमदनगर, लातूर, धाराशीव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.