
IMD चा अतिवृष्टीचा इशारा, या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर
IMD Alert :- राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे सोबतच वीजांचा कडकडाट बघायला मिळाला आहे.
हवामान खात्याने सांगितलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबामुळे राज्यात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
दिनांक 27, 28 जुलै रोजी राज्यात विविध ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामन विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान अंदाज महाराष्ट्र
आज दिनांक 27 जुलै रोजी राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा रेड व ऑरेंज अलर्ट विविध जिल्ह्यांना देण्यात आला आहे.
रेड अलर्ट असणारे जिल्हे :-
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 27 जुलै रोजी पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देऊन या जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.
ऑरेंज अलर्ट दिलेले जिल्हे :-
यामध्ये नागपूर, भंडार, गोंदिया, यवतमाळ, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन या जिल्ह्यात वीजांसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे.
सोबतच वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.