Government Onion Purchase | केंद्र सरकारचा मोठा निर्णय, या दराने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार
Onion Rate:- केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर तब्बल 40 टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव पडल्याकारणाने राज्यातील राजकारण पेटल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून विरोधकांकडून या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे.
परिणामी केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरुण दिलेली आहे.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचेशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला आहे.
👉कांदा अनुदान योजना 2023, रु.350/- प्रती क्विंटल मिळणार . फक्त या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान GR आला | Kanda Anudan Yojana 2023👈
केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
जवळपास 2410 रुपये प्रतीक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल अशी माहिती देण्यात आली.