PikVima Yadi 2023 | पावसातं खंड पडला ! खरीपातील पिकांचा पिकविमा मिळणार का ?
Kharif Pikvima 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखात बघणार आहोत की पावसातं खंड पडल्यास आपल्याला पीक विमा मिडणार का ? मिळणार तर किती प्रमाणात मिळणार ? पीकविमा मिळण्याचे गणित काय ?
चला तर संपूर्णपणे ही माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकारने यावर्षीपासून राज्यात 1 रुपयात पीकविमा योजना लागू केली आहे. या योजनेतर्गत राज्यातील जवळपास 1 कोटी 69 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सक्रिय सहभाग घेतला आहे.
Pik Vima Agrim Maharashtra
चालू ऑगस्ट महिन्यात राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसात खंड बघायला मिळत आहे. त्यामुळे खरीपातील बहुतांश पिके आता पाण्याअभावी धोक्यात आले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेमद्धे भाग घेतला आहे त्या शेतकऱ्यांना पीकविमा भेटणार का ? आणि भेटणार तर किती प्रमानात भेटणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे.
21 दिवसापेक्ष्या जास्त पावसाचा खंड राहीला तर कुठलाही पाऊस न झाल्यास तर शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई मिळते. 21 दिवसामध्ये पर्जन्यवृष्टि (एका दिवसात 2.4 मिलीमीटर पेक्ष्या अधिक नाही) प्रतिकूल हंगामी परिस्थितीत पीकविमा देण्याची तरतूद आहे.
Pikvima Yojana 2023
राज्यातील 19 जिल्ह्यातील 376 महसूल मंडळात 21 दिवसापेक्ष्या जास्त काळ पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पीकविमा भरपाई मिळण्यासाठी लागू असलेली मध्यवर्ती प्रतिकूल परिस्थिति निर्माण झाली आहे. या मंडळातील परिस्थिति बघता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व्हे सुरू केल्याची माहिती कृषि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांनी दिली आहे.
हंगामात प्रतिकूल परिस्थिति निर्माण होऊन पिकांचे नुकसान झाल्यास किती मिळतो पीकविमा ?
जर आपल्या मंडळात खरीप पीक 50% ने घटणार हे जर सर्वेक्षणातून निश्चित झाले तर आपल्या मंडळात गेल्या 7 वर्षातील खरीप पीक उत्पादनाची सरासरी काढली जाणार.
अग्रिम नुकसान भरपाईचे निकष ?
महसूल मंडळात सलग 21 दिवसापेक्ष्या जास्त पावसाचा खंड असल्यास पीकविमा समितीने केलेल्या सर्वेक्षणात उत्पन्न घट झाली हे सूचित होत असल्यास 25% अग्रिम भरपाई साठी पात्र असतात. आणि सोबतच या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका असते.
तालुका पीकविमा समितीने केले सर्वेक्षण 50% पेक्ष्या उत्पादन कमी असल्याचे निदर्शनास आल्यास तुमच्या क्षेत्रापैकी 25% अग्रिम नुकसान भरपाई देण्यासाठी सूचना जारी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत.
अग्रिम भरपाईचे सूत्र :-
सरासरी उत्पादन – यंदाचे उत्पादन
————————————————————– x संरक्षित रक्कम x २५%
सरासरी उत्पादन
उदारणार्थ :-
सरासरी उत्पादन १० क्विंटल – यंदाचे उत्पादन ५ क्विंटल
————————————————–x संरक्षित रक्कम ५० हजार x २५% = ६२५० रुपये
सरासरी उत्पादन १० क्विंटल
या सूत्रांनुसार आपल्या मंडळातील शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी ६२५० रुपये अग्रिम नुकसान भरपाई दिली जाणार.