
Agrim Pikvima 2023 | या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार 25% अग्रिम पिकविमा
Pikvima List 2023 :-गेल्या ऑगस्ट महिन्यात राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसात खंड बघायला मिळत आहे. त्यामुळे खरीपातील बहुतांश पिके आता पाण्याअभावी धोक्यात आले आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांना पावसांत खंड पडल्यामुळे पिकांच नुकसान होत असल्याकारणाने पिकविमा मिळणार का अशी आस लागली आहे.
Pik Vima Agrim Maharashtra
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बिड जिल्ह्यात सोयाबीन, मूंग व उडीद या पिकांचे नुकसान 50% च्या वर झालेलं आहे.
Pikvima Yojana 2023
बीड जिल्ह्यातील 87 महसुली मंडळांमध्ये सोयाबीन मूग व उडीद या तीन प्रमुख पिकांचे नुकसान हे 50 टक्के पेक्षा अधिक असल्याने या सर्व 87 महसुली मंडळात अग्रीम पीक विमा मंजूर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनात देण्यात आले होते.
त्यानुसार बीड जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिसूचना जारी केलेली असून, सदर सर्व 87 मंडळातील सोयाबीन, मूग व उडीद या तीनही पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत 25% प्रमाणे अग्रीम पिक विमा मिळणार आहे.