Namo Shetkari Yojana 2023
Namo Shetkari Yojana 2023 :- सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना घोषित करण्यात आली होती.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रती वर्ष, प्रती शेतकरी रु. 6000/- या अनुदानामद्धे राज्य शासनाची आणखी रु. 6000/- इतक्या निधीची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” Namo Shetkari Yojana 2023 ही योजना राबविण्यास संदर्भ क्र. 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
PM Kisan Yojana
सदर योजेनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनीयत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती, आयुक्त (कृषि) यांचे नावे “बँक ऑफ महाराष्ट्र” या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यास संदर्भ क्र. 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
Namo Shetkari Yojana 2023
आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भ क्र. 4 च्या पत्रांन्वये केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी (माहे एप्रिल ते जुलै) रु. 1720/- कोटीं इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी ( एप्रिल ते जुलै ) रु. 1720/- कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
राज्य शासनाने पहिल्या हप्त्यासाठी निधी मंजूर केल्यामुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच नमो शेतकरी महासन्मान योजेनेचा पहिला हप्ता मिळणार आहे.
हे पण वाचा 👉 Nuksan Bharpai List 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी आली