IMD Rain Alert | चक्रीवादळाचा राज्याला तडाखा ! या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100

IMD Rain Alert

IMD Rain Alert

IMD Rain Alert:- नमस्कार मित्रांनो, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचांग चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील वातावरणात बघायला मिळत आहे. सोबतच हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मिचांग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे.

मित्रहो, आज दुपारच्या सुमारास बंगालच्या उपसागरात घोंघावणारे मिचांग चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या नेल्लोर किनारपट्टी भागात धडकले, परिणामी आंध्रप्रदेशच्या व तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

IMD Rain Alert

हवामान खात्याच्या IMD Rain Alert अंदाजानुसार आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड सह राज्यातील विदर्भ प्रदेशात पाऊस होणार आहे, सोबतच मराठवाड्यात मुख्यता ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

उद्या दिनांक 6 डिसेंबर रोजी राज्यातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान खात्याने एलो अलर्ट दिला असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे.

सोबतच 7 डिसेंबर रोजी सुद्धा वर दिलेल्या जिल्ह्यात ढगाळ वतावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

👉PM Kisan Yojana | PM Kisan चा 16 वां हप्ता बँक खात्यात कधी येणार ? कधी मिळेल ते जाणून घ्या
👉Nuksan Bharpai Yadi 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! नुकसान भरपाईचा GR आला; इथे बघा या जिल्ह्याची यादी

Leave a Comment