Loan Waiver List 2024
Loan Waiver List 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून कर्जमाफीचा एक शासन निर्णय घेण्यात आला आहे तर या संदर्भातच या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.
राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्तिथित बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रु.52,562.00 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे.
सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्र.5 च्या पत्रान्वये रु. 379.99 लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रु. 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
Loan Waiver List 2024
सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रु. 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
👉Rain Forecast Maharashtra | पुढचे 24 तास धोक्याचे ! हे जिल्हे वगळता उर्वरित राज्यात जोरदार वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा.👈
वित्त विभागाच्या दि.05.02.2024 रोजीच्या परीपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70 टक्के म्हणजे रु. 265.99 लाख (रु. दोनशे पासष्ट्ट लाख नव्यान्नव हजार फक्त) एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्तिथित बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ Loan Waiver List 2024 करण्यासाठी सहाय्य (राज्यस्तर)(कार्यक्रम), (2435 0133) 33 अर्जसहाय्य या लेखशीर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.