IMD Alert For Maharashtra | 2 जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला धोका ! हवामान विभागाचा बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100

IMD Alert For Maharashtra

IMD Alert For Maharashtra

IMD Alert For Maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रहो, मे महिन्याची सुरुवात होताच राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे तर गेल्या 3 दिवसापासून दुपारपर्यंत वातावरण मोकळे राहत असून नंतर अचानक बदल होऊन वादळी पाऊस झाल्याच वृत्त बघायला मिळत आहे.

मित्रहो, 9 मे 2024 रोजी पूर्वविदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली या जिल्ह्यात सोसाटाच्या वाऱ्यासह जोरदार वादळी पाऊस झालेला आहे तर 10 मे रोजी पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात दुपारनंतर जोरदार वादळी पाऊस झालेला आहे.

IMD Alert For Maharashtra

हवामान विभागाने पुढील 3 दिवस राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना वादळी पावसाचा धोका असल्याचा अंदाज दिला आहे यामध्ये 11 मे रोजी पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना येलो दिला आहे. या जिल्ह्यांत वीजांसह वादळी पावसाची शक्यता आहे.

👉Electricity Rate Hike | दुष्काळात शेतकऱ्यांना 12% पर्यंत वीज दरवाढीचा ‘शॉक’ ! कृषिपंपासाठी नवीन दर जाहीर

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

दिनांक 12 मे रोजी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला असून पुणे, सातारा, लातूर, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी IMD Alert For Maharashtra गारपीटीची शक्यता असल्याचा अंदाज दिला आहे, पालघर, मुंबई ही जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

दिनांक 13 मे रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, व मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

Leave a Comment