Havaman Andaj Today | पुढील काही तासात या जिल्ह्यात मुसळधार ; इतक्या जिल्ह्यांना रेड अलर्ट !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात गेले 2 दिवसापासून बऱ्याच जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळत आहे. तर काही ठराविक ठिकाणीच पाऊस होताना दिसत आहे.

मित्रहो, काही ठिकाणी अजूनही सरासरी इतका पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, पण हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस होऊ शकतो.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 14 जुलै 2024 रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून संबंधित जिल्ह्यांना रेड, ऑरेंज व येलो अलर्ट देण्यात आले आहे.

Havaman Andaj Today

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यामध्ये 14 जुलै रोजी सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून याठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. सोबतच रायगड, मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर, गडचिरोली, नाशिक, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यासोबतच मराठवाडा व विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

👉Ladki Bahin Yojana Update | लाडकी बहीण योजनेत पुनः 12 मोठे बदल ! नवीन GR आला.

Leave a Comment