IMD Weather
IMD Weather :- राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असून राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मित्रहो, जून महिन्यात राज्यात पाऊस हा सरासरी पेक्षा कमी झालेला होता.
पण जुलै महिन्याची सुरुवात झाल्यावर पावसाने जोर पकडला व जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने चांगलाच जोर पकडला असून राज्यात 19 जुलै पासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस होणार असून दिनांक 28 जुलै 2024 रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
IMD Weather
यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यात दिनांक 28 जुलै रोजी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यात सुद्धा हलका पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.