Niradhar Yojana Maharashtra | खुशखबर ! या योजनेचे लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर येणार अनुदान

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
78 / 100

Niradhar Yojana Maharashtra

Table of Contents

Niradhar Yojana Maharashtra

Niradhar Yojana Maharashtra :- नमस्कार मित्रहो, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिकांसाठी महत्वाच्या योजना राबविण्यात येतात, यामध्ये काही योजनाच्या माध्यमातून नागरिकांना मदत म्हणून अनुदान सुद्धा दिले जाते आता हे अनुदान DBT च्या माध्यमातून देण्यात येते. 

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून अर्थसाहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल द्वारे करण्यात येत आहे. 

Niradhar Yojana Maharashtra

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 28 जानेवारी 2025 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डीबीटी पोर्टलवर झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 29 लाख 77 हजार 250 इतके आहे. त्यापैकी डीबीटी पोर्टल वर Aadhar Validate झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 19 लाख 74 हजार 85 इतकी आहे. 

जानेवारी व फेब्रुवारी 2025 या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे केवळ डीबीटी पोर्टलवर Aadhar Validate झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

दिनांक 28 जानेवारी 2025 पर्यंत डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिटेड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 9 लाख 35 हजार 297 तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 10 लाख 38 हजार 788 इतकी असून अशा आधार व्हॅलिडेट झालेल्या एकूण 19 लाख 74 हजार 85 लाभार्थ्यांना जानेवारी व फेब्रुवारी 2025 या दोन महिन्यांचे अर्थ सहाय्य डीबीटी पोर्टल द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रुपये 610 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे आणि या निधी वितरणाला राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे Aadhar Validate झालेल्या लाभार्थ्यांनाच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जे अर्थसहाय्य आहे ते मिळणार आहे.

शासन निर्णय : इथे पहा

 

 ✅PM Kisan Scheme Update | आता या शेतकऱ्यांना पीएम किसान चा लाभ नाही मिळणार

Leave a Comment