Maharashtra Heavy Rain Alert
Maharashtra Heavy Rain Alert :- नमस्कार मित्रहो, राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत असून या उष्णतेच्या लाटेबरोबर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होताना बघावयास मिळत आहे.
गेल्या 5 ते 6 दिवसापासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात खासकरून सायंकाळच्यावेळी रात्री जोरदार वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे, यासोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सुद्धा अशीच परिस्तिथी बघावयास मिळते आहे.
Maharashtra Heavy Rain Alert
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासात म्हणजेच आज आणि उद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असून यामध्ये विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे.
आज दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी नांदेड, लातूर, धाराशीव, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला असून या जिल्ह्यात सायंकाळच्यावेळी जोरदार वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते माध्यम पावसाची शक्यता आहे.
यासोबतच दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह, वीजांच्या कडकडाटासह माध्यम पावसाची शक्यता आहे.