Pikvima Yojana 2023 | या शेतकऱ्यांना मिळणार कोविड काळातील प्रलंबित पीकविमा, कृषिमंत्र्यांचे आदेश

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
71 / 100
Pikvima-Yojana-2023
Pikvima-Yojana-2023

Pikvima Yojana 2023 | या शेतकऱ्यांना मिळणार कोविड काळातील प्रलंबित पीकविमा, कृषिमंत्र्यांचे आदेश

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सन 2020-21 मध्ये व विशेषकरून कोविड काळातील वेगवेगळ्या कारणांनी थकीत राहिलेला देय पीकविमा संबंधित विमा कंपन्यानी तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करावा अन्यथा होणाऱ्या कारवाईस तयार रहावे, असा इशारा झालेल्या बैठकीत कृषिमंत्री मुंडे यांनी दिला आहे.

Pik Vima 2023

या बैठकीस कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स, इफको टोकियो जनरल इन्शुरन्स, बजाज अलियांज, भारती एक्सा, रिलायन्स आदी विमा कंपन्यांचे अधिकारी/प्रतिनिधी उपस्थित होते.

कोविडच्या जागतिक आपत्तीच्या काळात कंपन्यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून प्रलंबित ठेवलेले विमा देयके तातडीने अदा न केल्यास संबंधित कंपन्यांवर कारवाई केली जाईल, असे या बैठकीत स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा 👉👉Agrim Pikvima 2023 | या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार 25% अग्रिम पिकविमा

Leave a Comment