![Havaman andaj today](https://marathi24taas.in/wp-content/uploads/2023/12/20231205_083448-2.png)
Havaman andaj today Havaman andaj today
Havaman andaj today:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचांग चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणात मोठा बदल घडताना बघायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.
चक्रीवादळामुळे वाऱ्यांचा वेग हा 85 ते 100 किमी प्रतितास इतका आहे, Havaman andaj today मिचांग चक्रीवादळ दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास आंध्रप्रदेश च्या नेल्लोर किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता आहे.
Havaman andaj today
मिचांग चक्रीवादळाचा परिणामस्वरूप राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन बहुतांश ठिकाणी पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ परिसरात 5, 6 डिसेंबर रोजी मुख्यतः ढगाळ वातावरण राहून बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात पुढील 48 तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.