Water Pump Auto Switch
Water Pump Auto Switch :- नमस्कार मित्रांनो, राज्यात रब्बी हंगाम सध्या जोरात सुरू आहे, सोबतच रब्बीतिल पिकांना ओलीत देणे सुद्धा चालू आहे, पिकांना ओलीत देत असताना विजेची ये-जा (लपंडाव) सुरू असते.
विजेच्या लपंडावाला कंटाळून बहुतांश शेतकरी हे आपल्या कृषि पंपाना ऑटो स्विच Water Pump Auto Switch बसवितात, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येकवेळी पंप चालू करण्यासाठी पंपाजवळ जाण्याची गरज नसते.
Water Pump Auto Switch
पण यामुळे विजेचा पुरवठा सुरू झाल्यानंतर लगेच सर्वत्र कृषि पंप चालू होत असल्याने रोहित्रावर भार पडत आहे, एकाचवेळी रोहीत्राला विद्युतभार सहन ं झाल्याने फ्यूज जातो, त्यामुळे वीज पुरवठा खंडित होणे, रोहीत्र जळण्याच्या घटना घडत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
त्यामुळे ऑटो स्विच काढून कपॅसिटर बसवावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
👉PM Kisan Yojana | PM Kisan चा 16 वां हप्ता बँक खात्यात कधी येणार ? कधी मिळेल ते जाणून घ्या
महावितरणच्या आकडेवारीनुसार 90% शेतकऱ्यांकडे ऑटो स्विच बसविले आहेत, यामध्ये सुरुवातीला कारवाईत ऑटो स्विच आढळणाऱ्या शेतकऱ्यांची काही काळासाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे, पण शेतकऱ्यांनी वारंवार अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास महावितरणकडून दंडात्मक कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.