Havaman Andaj Today
Havaman Andaj Today :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातून मान्सून माघारी फिरत असताना बहुतांश जिल्ह्यात आपल्याला मेघगर्जनेसह पाऊस होताना दिसतो आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. सोबतच पुढील 2 त 3 दिवसात ते आणखी तीव्र होऊन समुद्रात वायव्येकडे सरकणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे.
या प्रणालीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. काल दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळच्यावेळी पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झालेला आहे. सोबतच आज पहाटेपासून विदर्भातील चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील काही भागात वीजांच्या कडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे.
Havaman Andaj Today
हवामान विभागाने आज दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिलेला असून रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. सोबतच धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, अहमदनगर, पालघर, ठाणे, मुंबई, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.