Imd Alert For Tomorrow | पुढील 24 तासांत या जिल्ह्यांत होणार मुसळधार पाऊस

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
64 / 100
Imd-Alert-For-Tomorrow
Imd-Alert-For-Tomorrow

Imd Alert For Tomorrow | पुढील 24 तासांत या जिल्ह्यांत होणार मुसळधार पाऊस

Rain Update :- भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच राज्यात पाऊस बघायला मिळत आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी विश्रांती घेतली होती त्यामुळे शेतकर्यांची खरीपाची पिके धोक्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या मध्यापासून राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात होईल असा अंदाज दिला होता तो आता खरा ठरताना दिसतो आहे.

आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावलेली बघायला मिळाली आहे. या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसोबत च राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान खात्याचा अंदाजानुसार येत्या 24 तासांत विदर्भ, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुढिल 24 तासांत विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, बिड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

सोबतच पुणे, सातारा, सोलापूर, सांगली इथे सुद्धा येत्या 24 तासांत पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment