Pikvima Yadi 2023
पीक विमा कंपनीच पितळ उघड ! पंचनाम्यात मोठा घोळ | कृषि विभागाची सतर्कता | जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
Pikvima Yadi 2023
गेल्या खरीप व रबी हंगामामद्धे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामा करताना पीक विमा कंपनीने अफरातफर केल्याचे कृषिविभागाच्या निदर्शनास आले.
![]() |
pik-vima-yadi-2023 |
पीक विमा
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानीचे पंचनामे करताना कृषि विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी आणि विमा कंपनीचा प्रतिनिधि संबंधित नुकसान झालेल्या शेतकऱ्यासमोर पंचनामा करीत असतात. पन यामध्ये पीक विमा कंपनीने शेतकऱ्यासमोर केलेल्या पंचनाम्यात अफरातफर केल्याचे आढळून आले आहे.
‘Pikvima Yadi 2023’
सदर बाब कृषि विभागाच्या उघडकीस येताच कृषि विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्ष्यात आणून दिले. चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी तात्काळ आढावा बैठक घेऊन याबाबत चौकशीचे आदेश दिले आहे.
या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, Pikvima Yadi 2023जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे सोबतच तालुका स्तरावरून तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते
सदर प्रकरणामध्ये पीकविमा कंपनीने केलेल्या अफरातफरी मध्ये मुळ पंचनाम्यात खोडतोड, बनावट स्वाक्षरी, आकड्यांमद्धे तफावत, वेगळे शिक्के, बनावट झेरॉक्स असे प्रकार काही तालुक्यात आढळून आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये पंचनाम्यातील आकड्यात तफावत, व्हाईटणार लावून पुनः लिहिलेले, खोडतोड असे वेगवेगळे वर्गीकरण करून तालुका कृषि अधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हा मुख्यालयी माहिती सादर करावी. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यामधील 1111 पंचनाम्या मध्ये तफावत आढळून आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामद्धे सर्वाधिक 822 प्रकरणे आढळून आली आहे, पोंभउर्णा 60, चिमुर 162, गोंडपीपरी 37, चंद्रपूर 25, सावली 5.
सोबतच इतर तालुक्यातील माहिती निरंक असला “pikvima” तरी तेथील तालुका कृषि अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घ्यावी असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.