Cabinet-Decisions-for-MSKVY
Cabinet Decisions for MSKVY
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय | मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजूरी
काल दिनांक 19 एप्रिल रोजी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. त्यातील एक निर्णय शेतकऱ्यांसाठी सुद्धा घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना
शेतकऱ्यांना शेती पिकांना ओलीत देण्यासाठी ओलिताची सोय असणे गरजेचे असते सोबतच वीज असणे सुद्धा तितकीच गरजेची आहे. आपण बगतच आहोत की शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना पानी देण्यासाठी पुरेश्या प्रमाणात वीज मिळत नाही. जी वीज मिळते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचे भारनियमन (लोडशेडिंग) असते. शेतकऱ्यांना वीज ही दिवसा कमी आणि रात्री जास्त दिली जाते. MSKVY
परिणामी विजेअभावी शेतकरी पिकांना पानी देऊ न शकल्यामुळे त्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.
यावरच उपाय म्हणून मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजूरी सुद्धा देण्यात आली आहे.’मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना pdf’
त्यामध्ये शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेचा दूसरा टप्पा राबविण्याचा निर्णय.
सन 2025 पर्यन्त 30 टक्के वाहिन्यांना सौर उर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील 45 लाख कृषि वीज ग्राहकांना होईल. “कुसुम सोलर योजना”
सन 2023 ते 24 पर्यन्त आणि 2028 ते 29 या कालावधीसाठी एकूण 700 कोटी रुपयांच्या निधीस आणि त्यापैकी 2023-24 साठी 25 कोटी रुपये इतका निधी हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यास मान्यता.