![]() |
Skymet-Monsoon-Forcast-2023 |
Skymet Monsoon Forcast 2023 | एल-निनो चा प्रभाव ! यंदा देशात मान्सून सरासरीपेक्षा कमी पडणार, स्कायमेट या हवामान संस्थेचा पहिला अंदाज.
Skymet Monsoon Forcast 2023
देशातील अग्रेसर हवामान अभ्यासक स्कायमेट या संस्थेने देशामध्ये आगमन होणाऱ्या मॉन्सून 2023 संदर्भात अंदाज जाहीर केलेला आहे. monsoon andaj 2023
स्कायमेट च्या अंदाजानुसार देशामध्ये जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामा मध्ये सरासरी 868.8 मी. मी. च्या तुलनेत 816.5 मी. मी. म्हणजेच 94% सामान्यपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी स्कायमेट ने जानेवारी 2023 मध्ये सुद्धा मान्सून 2023 संदर्भात अंदाज वर्तवीला होता त्यात सुद्धा मान्सून सरासरी पेक्षा कमी राहण्याचा अंदाज दिला होता. मान्सून अंदाज 2023
Monsoon 2023
आता ला-निना संपला असला तरी एल-निनो चा धोका पुढे मान्सून हंगामा मध्ये अधिक राहण्याची शक्यता असल्यामुळे त्याचा भारतीय मान्सून वर विपरीत प्रभाव होऊ शकतो आणि त्यामुळेच देशातील विविध भागामध्ये पाऊस कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे असं स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह म्हणाले.
मान्सून अंदाज 2023
मित्रहो, गेल्या मार्च महिन्यात व आता एप्रिल महिन्यात सुद्धा आपल्या राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच देशामध्ये मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या चिंतेमद्धे आणखी भर पडण्याची शक्यता आहे. (Monsoon 2023)
मान्सून हंगामात जुलै , आगस्ट या मुख्य पाऊस पडण्याच्या महिन्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश मध्ये पाऊस कमी पडेल. सोबतच पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांत सुद्धा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडण्याचा आंदज आहे. ‘स्कायमेट हवामान अंदाज’
{2023 सालचा मान्सून कसा असेल ?}
मान्सून 2023 या हंगामात कोणत्या महिन्यात किती पाऊस होणार ?
जून महिन्यात सरासरी पाऊस
⁕ सामान्य 70% पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 10% अधिक पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 20% कमी पावसाची शक्यता
जुलै महिन्यात सरासरी पाऊस
⁕ सामान्य 50% पावसाची शक्यता “monsoon andaj 2023″
⁕सामान्यपेक्षा 20% अधिक पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 30% कमी पावसाची शक्यता
आगस्ट महिन्यात सरासरी पाऊस
⁕ सामान्य 20% पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 20% अधिक पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 60% कमी पावसाची शक्यता
सप्टेंबर महिन्यात सरासरी पाऊस
⁕ सामान्य 20% पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 10% अधिक पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 70% कमी पावसाची शक्यता