![]() |
Cotton-Dust-Mites |
Cotton Dust Mites
घरात साठवून ठेवलेल्या कापसामुळे अंगाला खाज सूटतेय ! तर हे उपाय नक्की करा.
राज्यातील शेतकऱ्यांचे महत्वाचे नगदी पीक म्हटल तर ऊस, आणि कापूस आहे. राज्यात कापूस पिकाखाली क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.
या वर्षी राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी कापसाचे दर वाढणार या आशेने कापूस घरामध्येच साठवून ठेवलाय, पण त्यामुळेच आता शेतकऱ्यांना त्या कापसाचा त्रास व्हायला लागला. ‘धूळ कोळी नियंत्रण’
कारण भाव वाढीच्या आशेने कापूस घरातच साठवून ठेवल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्वचा रोगाचा सामना करावा लागत आहे. या कापसामद्धे डस्ट माईट्स चा प्रादुर्भाव (Dust Mites Allergy) झाल्याने व ते चावल्यामुळे खाज सुटणे, श्वसनासाठी त्रास होणे, पुरळ येणे ही लक्षणे आढळून यायला लागली आहे. डस्ट माईट्स ही कीड सूक्ष्म असल्याने ती डोळ्याने दिसत नाही.How To Prevent Dust Mites
धूळ कोळी नियंत्रण
✅ ज्या ठिकाणी कापसाची साठवणूक केली असते तिथे स्वच्छता राखावी, कारण तिथे जर धूळ वाढत गेल्यास डस्ट माईट्स साठी पोषक वातावरण होते.
✅ दरवर्षी ज्या ठिकाणी कापूस साठवणूक करतो ती जागा अगोदरच निर्जंतुक करून घ्यावी, त्यासाठी तुम्ही नेहमी घरात वापरनाऱ्या सॅनिटायझरचा वापर करू शकता ज्यामध्ये त्या जागेचा पृष्टभाग, सोबतच्या भिंती पुसून स्वछ कराव्यात.
✅ सोबतच प्रोपोक्सर (20 ईसी ) 25 मिलि. प्रती लिटर पाण्यात घेऊन संपूर्ण गोदामात अथवा साठवणूक करण्याच्या ठिकाणी फवारणी करावी.
✅ साठवलेल्या कापसात काही अंशी डस्ट माईट्स चा प्रादुर्भाव झाला असल्यास प्रोपोक्सर (20 ईसी ) 25 मिलि. प्रती लिटर पानी याप्रमानात एखादी फवारणी करावी. फवारणीमुळे कापसातील ओलावा वाढू नये, यासाठी ( काळजी घ्यावी ) फवारणीचे द्रावण कमीत कमी वापरावे.”Cotton Dust Mites”
✅ फवारणीच्यावेळी फवारणी सुरक्षा किट अवश्य वापरावी. फवारणीनंतर किमान 24 ते 48 तास फवारणी केलेल्या ठिकाणी जाणे टाळावे, गेल्यास श्वासाद्वारे विषबाधा होऊ शकते.
✅ जास्त काळ कापूस साठवणूक करून न ठेवता योग्य बाजार भाव मिळताच विक्री करावी.
✅ कापूस हाताळताना डस्ट माईट्समुळे त्रास झाल्यास अथवा लक्षणे दिसून आल्यास त्वरित डाक्टरांचा सल्ला घ्यावा.