![Namo-Shetkari-Yojana-2023](https://marathi24taas.in/wp-content/uploads/2023/07/Namo-Shetkari-Yojana-2023-300x150.png)
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच, शासन निर्णय आला | Namo Shetkari Yojana 2023
नमस्कार शेतकरी मित्रहो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की पीएम किसान प्रमाणे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना जाहीर केली आहे. गेल्या 27 जुलै रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एका क्लिक वर देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीएम किसान चा चौदावा हप्ता DBT च्या माध्यमातून ट्रान्सफर केला आहे. सोबतच राज्यातील शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाने महत्वपूर्ण शासन निर्णय घेतला आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता वितरण करण्यासाठी राज्य सरकारने 28 जुलै रोजी शासन निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामुळे आता लवकरच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे. सदर झालेला शासन निर्णय बघायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही शासन निर्णय बघू शकता.
Election stunt