Weather Update | आजही राज्यात मुसळधार ! या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
Havaman Andaj :- विदर्भात होत असल्याने मुसळधार पावसामुळे या भागातील बहुतांश जिल्ह्यात पुर परिस्थिति बघायला मिळत आहे, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 दिवस विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात मुसळधार पावसाचा इशारा आहे.
हवामान अंदाज महाराष्ट्र
आज दिनांक 23 जुलै रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज व येलो अलर्ट देऊन जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ?
यामध्ये आज दिनांक 23 जुलै रोजी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
येलो अलर्ट असणारे जिल्हे
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर अमरावती अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आल आहे.
सोबतच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या जिल्ह्यात सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवीला आहे