Crop Insurance | आपण 1 रुपयात पीकविमा काढलाय, पण या गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय पीकविमा मिळणार नाही !
Pik Vima :- देशात जेव्हा नैसर्गिक आपत्ति जसे की अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, सततचा पाऊस इ. सोबतच कीड व रोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमानात नुकसान होत असते.
त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो त्यावर एक उपाय म्हणून केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना संपूर्ण देशात राबविण्यात येते. याआधी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या अनुक्रमे 2% व 1.5% हफ्ता भरावा लागायचा. तर नगदी पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या 5% हफ्ता भरावा लागायचा.
यावर्षी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीकविमा योजना सुरू केली आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद बगता पीक विमा भरण्यासाठी (पीकविमा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 होती) राज्य सरकारने 3 ऑगस्ट पर्यन्त मुदतवाढ सुद्धा दिली होती.
पण मित्रहो पीकविमा मिळवण्यासाठी काही महत्वाच्या अटी व शर्ती सरकारने निश्चित केल्या आहेत व त्या पूर्ण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन सुद्धा राज्य शासनाने केले आहे.
या अटी व शर्ती पूर्ण केल्या तरच पीकविमा मिळणार..
✅ सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाची पीक पेऱ्याची नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी पिकाची पेऱ्याची नोंद ही ई-पीक पाहणी या आप्लीकेशन च्या सहाय्याने पूर्ण करून घ्यावी. (Pik Vima Yadi 2023)
ई-पीक पाहणी जर तुम्ही केली नाही तर तुमचा पीक पेरा कोरा राहून जमीन पडीक समजली जाईल. त्यामुळे तुम्ही पीक विमा मिळवण्यासाठी अपात्र व्हाल.
✅ अतिवृष्टी, गारपिट, दुष्काळ, कीड, रोगामुळे व कोणत्याही प्रकारच्या आपत्ति पासून पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार पीक विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळवणे बंधनकारक राहील. (नुकसान भरपाई 2023)
या मुळे शेतकरी मित्रहो आपण जर 1 रुपयात पीकविमा काढला असेल तर वरील दोन्ही गोष्टीची पूर्तता वेळेतच नक्की करा ज्यामुळे आपण पीकविमा लाभापासून वंचित राहणार नाही. माहिती आवडल्यास ही माहिती इतर शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा.