![E-Pik-Pahani-Maharashtra-List-2023](https://marathi24taas.in/wp-content/uploads/2023/08/E-Pik-Pahani-Maharashtra-List-2023-2.png)
E Pik Pahani Maharashtra List 2023 | पीक विमा मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी बंधनकारक, गावानुसार ई-पीक पाहणी नवीन यादी जाहीर
E-Pik Pahani 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात काही प्रमाणात झालेल्या पावसामुळे राज्यातील खरीप 2023 च्या पेरण्या जवळपास झालेल्या आहे. दरवर्षी प्रमाणेच यावर्षीसुद्धा ई-पीक पाहनीला सुरुवात झालेली आहे, 1 जुलै 2023 पासून राज्यात खरीप ई-पीक पाहणी नोंदणीला सुरुवात झालेली आहेत.
E Pik Pahani 2023 | ई-पीक पाहणी 2023
ज्या शेतकऱ्यांनी खरीपातील आपल्या पिकाची ई-पीक पाहणी (E Pik Pahani) केलेली आहे. अश्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या जाहीर झालेल्या यादीत नाव असेल तरच आपली पीक पाहणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
तसेच यादीत नाव नसेल तर लवकरात लवकर E Pik Pahani App च्या मदतीने पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे.
ई-पीक पाहणी म्हणजे काय ?
ई पीक पाहणी एप्लीकेशन हा एक सर्वेक्षण एप्लीकेशन असून याच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद करता येते. शेतकऱ्यांना पीक विमा किंवा इतर नुकसान भरपाई चा थेट लाभ मिळवण्यासाठी ई पीक पाहणी पद्धत शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे.
ई-पीक पाहणी गावानुसार यादी कशी पाहायची ?
✅ सर्वप्रथम तुमच्या मोबईल मध्ये ई-पीक पाहणी एप्लीकेशन इंस्टाल असणं महत्वाच आहे.
✅ मोबईल मधील ई पीक पाहणी एप्लीकेशन ओपन करा.
✅ त्यानंतर आपला महसूल विभाग निवडून त्याखालील बाणावर क्लिक करा.
✅ आता आपल्यासमोर खातेदाराचे नाव निवडा असे दिसेल त्यानुसार तुम्ही तुमचे नाव निवडून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करताना सांकेताक 4 अंकी नंबर मिळाला असेल तो टाकून उजव्या बाणावर क्लिक करा. ही केल्यावर ई पीक पाहणी एप्लीकेशन चालू होईल.E Pik Pahani List 2023
✅ आता तुमच्यासमोर 6 पर्याय दिसतील त्यातील ‘गावाचे खातेदारांची पीक पाहणी’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. तुमच्यासमोर तुमच्या गावातील कोणी कोणी ई पीक पाहणी केली आहे तसेच कोणी कोणी पीक पाहणी केली नाही सोबतच कोणते पीक लावलेले याची संपूर्ण यादी दिसेल.
ही आपल्याला आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेयर करा.