Imd Alert For Maharashtra | बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब; महाराष्ट्राला पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Rain Update :- राज्यात जुलै च्या दुसऱ्या पंढरवाड्यात मान्सून ला पोषक वातावरण तयार होऊन बहुतांश जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. सोबतच बहुतांश ठिकाणी अतिपावसामुळे पुरपरिस्थिति बघायला मिळाली.
तर मागच्या 3 दिवसापासून राज्यात विविध ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे पण अशातच हवामान खात्याने राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
यापूर्वी भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात देशभरात होणाऱ्या पावसासंदर्भात अंदाज जाहीर करण्यात आला आहे. हवामान खात्याने ऑगस्ट मध्ये होणारा पाऊस हा सरासरी पेक्ष्या (<94% LPA) कमी होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यात मुसळधार पाऊस कशामुळे ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बांगलादेशच्या किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, संध्याकाळपर्यंत ते कमी दाबाचे क्षेत्र खेपूपाराच्या पूर्वेला बांग्लादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 24 तासात गाणगेय पश्चिम बंगाल मध्ये धडकण्याची शक्यता आहे.
कमी दाबामुळे कुठल्या जिल्ह्यात मुसळधार ?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातिल कमी दाबाचा प्रभाव राज्यात सुद्धा दिसून येणार आहे. यामध्ये दिनांक 2 ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, जालना, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
3 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट देऊन या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.