Namo Shetkari Yojana | नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता लवकरच, कृषिमंत्री धनंजय मुंढे यांचे आदेश.
Namo Shetkari Yojana 1st Installment:- राज्य सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता अजूनही पात्र शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश कृषिमंत्री श्री. धनंजय मुंढे यांनी दिले आहेत.
Namo Shetkari Yojana 2023
कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशनात नमो शेतकरी योजनेसाठी 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमधून शेतकऱ्यांना 2 हफ्ते वितरित करणे शक्य आहे असे सुद्धा कृषिमंत्री म्हणाले आहे.
पावसाने ओढ दिलेल्या क्षेत्रातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या रकमेचीही काही प्रमाणात मदत होऊ शकते. त्यादृष्टीने तातडीने पहिला हफ्ता वितरित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
हे पण वाचा 👉👉Weather Forecast For Maharashtra | शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ? राज्यात या तारखेनंतरच पावसाची शक्यता
पीएम किसान योजनेतील निकषांची पूर्तता न झालेल्या 12 लाख शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्व अटींची पूर्तता करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबवली जात आहे.
आतापर्यंत 4 लाख शेतकऱ्यांनी सर्व अटींची पूर्तता केली आहे. सर्व उर्वरित पात्र शेतकरी बांधवांनी ई-केवायशी, भूमीअभिलेख नोंदी अद्ययावत करणे, बँक खात्याला आधार लिंक करणे आदि बाबींची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषि मंत्री श्री. धनंजय मुंढे यांनी केले आहे